विद्यार्थ्यांना आवश्यक व पुरेशी पुस्तके उपलब्ध करून शैक्षणिक वाचनालय सुरू करावे – चंद्रकांत पाटील !

Rokhthok Maharashtra 1 0

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेकडून आज पर्यंत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविले जातात ही नक्कीच अभिमानास्पद आहे, आपण उभारलेल्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुस्तकांची गरज असते, त्यासाठी वाचनालय सुध्दा सुरू करावी. आम्ही त्यासाठी नक्कीच सहकार्य करु असे आश्वासन उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्या वतीने उभारलेल्या अभ्यासिकेचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष जयंत देशपांडे, सुनिता तावरे उपस्थित होते.

 

यावेळी विश्वजीत देशपांडे, हेमंत रासने, राजेंद्र काकडेंसह अनेक मान्यवर, संस्थेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्र कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन सुनील पारखी यांनी केले.

जो समाज, जी संस्था काही मागत नाही, या संस्थेची महत्ता फार मोठी आहे. कारण कुठलीही गोष्ट ओरबाडून न घेता आवश्यक तेवढे घेतात त्यातील ही संस्था आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यातील योगदानात आपण काही तरी द्यावे या हेतूने प्रेरित होउन आम्ही मदत करायचं ठरवलं असे मत संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.

 

विद्यार्थ्यांना शहरातील छोट्या घरात अभ्यासासाठी पुरेशी जागा नसते हे लक्षात घेऊन संस्थेने या अभ्यासिकेची उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक व पुरेशी पुस्तके उपलब्ध करून शैक्षणिक वाचनालय सुरू करावं असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी करून त्यासाठी सहकार्य नक्कीच करेन असे आश्वासन दिले.

समाजाला जे आवश्यक आहे त्याला सरकार निधी उपलब्ध करून देवू शकत नसली तरी लोकसहभागातून त्याची पूर्तता करता येईल असेही मत प्रसंगी चंद्रकांत पाटील यावेळी व्यक्त केले.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.