हडपसरमध्ये भविष्यातील चॅम्पियन्स घडणार! प्रोफेशनल स्पोर्ट्स ट्रेनिंग सुरू

Rokhthok Maharashtra 2 0

हडपसर परिसरातील क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी… भविष्यातील चॅम्पियन्स घडवण्यासाठी मोठा उपक्रम सुरू!
हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानावर क्रिकेट आणि फुटबॉल या दोन्ही खेळांचे व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना आधुनिक ट्रेनिंग, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्किल डेव्हलपमेंटची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना पुणे शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक नाना भानगिरे यांच्या हस्ते करण्यात आले.

रिबन कट केल्यानंतर त्यांनी स्वतः मैदानावर उतरून खेळाडूं सोबत क्रिकेट खेळत त्यांना प्रोत्साहन दिलं.
स्थानिक नागरिक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियमित प्रॅक्टिस, फिटनेस आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर भर देत दर्जेदार क्रीडा वातावरण निर्माण करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.
उपक्रमामुळे हडपसरमध्ये क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळणार…

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.