पुणे

“परीक्षा परिषद सक्षम असताना, शिक्षण मंडळाकडे परीक्षा देण्याचा घाट” “अधिकाऱ्यांच्या स्वार्थापायी, चाललाय प्रकार”

शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणा-या परीक्षा या नेहमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या मार्फत घेतल्या जातात. परीक्षा परिषद या नावातच सर्व काही असून सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषद सक्षम असतानाही काही वरिष्ठ अधिकारी या परीक्षा शिक्षण मंडळाने घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

यंदा अकरावी प्रवेशासाठी ऑगस्टमध्ये ऑफलाईन ‘सीईटी’ परीक्षा होणार आहे, ती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ का महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार यामध्ये रस्सीखेच होताना दिसत आहे.

शिक्षण विभागामार्फत घेतल्या जाणा-या परीक्षा या नेहमी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या मार्फत घेतल्या जातात. परीक्षा परिषद या नावातच सर्व काही असून सर्व प्रकारच्या परीक्षा घेण्यासाठी परीक्षा परिषद सक्षम असतानाही काही वरिष्ठ अधिकारी हे काम शिक्षण मंडळाकडे देण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

राज्य मंडळाने दहावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन केले होते मात्र कोरोनामुळे त्या रद्द झाल्या दहावीच्या परीक्षेसाठी 415 रुपये प्रमाणे शुल्क जमा झाले होते यातून 70 कोटींचा गल्ला जमा झाला असून राज्य मंडळ की, परीक्षा परिषद यापैकी कोणाची अंतिम निवड करायची यासाठी काही खलबते सुरू असल्याची शक्यता आहे दोन विभागांनी एकत्र येऊन संयुक्तपणे समन्वयाने नियोजन करून परीक्षा घेणे ही मुश्किलच वाटत असल्याचे तर्कही लावले जात आहेत.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x