पुणे

विवाहितेला जीवे मारण्याची, मुलाला उचलून नेण्याची धमकी – हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल

पुणे – (Rokhthok Maharashtra Online ) विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलाला उचलून नेण्याची धमकी दिल्याचा प्रकार पुण्यातली फुरसुंगी परिसरात घडला आहे. विवाहित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन हडपसर पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पंढरपूर   व फुरसूंगी येथे ऑक्टोबर 2018 ते 20 ऑगस्ट 2021 या दरम्यान घडला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी विवाहित महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती विजय गवळी, सासरे सुखदेव गवळी , सासु सुंदरा गवळी, जाऊ मयुरी गवळी, दिर महेश गवळी, चेतन नवले (सर्व रा. सदाशिव नगर, फुरसूंगी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माहेरवरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी पीडित महिलेचा मानसिक आणि शारीरिक छळ करुन मारहाण केली. तर चेतन नवले याने पीडित महिलेला फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुलाला उचलून नेण्याची धमकी दिली. निलेश याने पीडित महिलेच्या पतीला वाईट सवयी लावुन पतीला घटस्फोट घेण्यास प्रोत्साहीत केले. पीडित महिलेने केलेल्या अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.