पुणे

तू पांढऱ्या पायाची आहेस, माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत विवाहितेला मारहाण ; पती, सासरे, सासू, दिर, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे  : (Rokhthok Maharashtra Online) –  तू पांढऱ्या पायाची आहेस, माहेराहून पैसे घेऊन ये असे म्हणत सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण (Beating) केली. सासरच्या लोकांकडून होत असलेल्या सततच्या त्रासाला वैतागून विवाहितेने हडपसर पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती, सासरे, सासू, दिर, नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुण्यातील  मांजरी, वालचंदनगर येथे घडला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी 31 वर्षीय विवाहित महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.
गुन्हा हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सांगवी पोलिसांनी हा गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.
विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पती अजिनाथ हनुमंत कांबळे,
सासरे हनुमंत कांबळे, सासु आनंदी कांबळे, दिर साईनाथ कांबळे आणि नणंद मनिषा चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजिनाथ यांचे पीडित महिलेसोबत 2011 मध्ये लग्न झाले आहे.
लग्नानंतर पतीने पीडितेच्या इच्छेविरोधात अनैसर्गिक संभोग केला.
पीडितेने पतीला विरोध केला असता त्याने मारहाण करुन गळा दाबण्याचा प्रयत्न केला.
तर इतर आरोपींनी माहेरवरुन पैसे घेऊन ये, तू पांढऱ्या पायाची आहे असे म्हणून पीडितेला शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच मारहाण करुन मानसिक व शारीरीक त्रास दिला.
पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.