पुणे

“निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय – राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा अध्यक्षपदी डॉ. शंतनू जगदाळे यांची निवड”

पुणे / हडपसर (प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर कार्यकारणी जाहीर झाली आहे, आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या हडपसर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. शंतनु जगदाळे यांची निवड करण्यात आली.
आमदार चेतन तुपे पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पुणे शहर जम्बो कार्यकारिणी जाहीर केली या कार्यकारणी मध्ये हडपसर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉ. शंतनु जगदाळे यांची निवड त्यांनी जाहीर केली.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणारा हडपसर विधानसभा मतदारसंघात खासदार म्हणून डॉ. अमोल कोल्हे तर आमदार म्हणून चेतन तुपे निवडून आले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात जास्त नगरसेवक हडपसर मतदार संघात आहेत, नव्याने समावेश झालेल्या गावांमुळे हडपसर विधानसभा मतदार संघातून मोठ्याप्रमाणात नगरसेवक निवडून जाणार असल्याने हडपसर व सर्वच नेत्यांनी लक्ष केंद्रित केले होते त्यामुळे हडपसर विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर शंतनु जगदाळे यांची निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे

राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अजित दादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला हडपसर विधानसभा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच तळागाळातील वंचितांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार होण्यासाठी काम केले जाईल
महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हडपसर विधानसभा मतदार संघाची कार्यकारणी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच जाहीर करू.
डॉ. शंतनु जगदाळे
नवनिर्वाचित अध्यक्ष
हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस