पुणे

घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पतीनं पत्नीच्या तोंडावर बुक्की मारत दात पडल्याची घटना

प्रतिनिधी स्वप्नील कदम

पुणे – पुण्यातील कौटुंबिक न्यायालयात पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिल्याने, पतीनं थेट पत्नीच्या तोंडावर बुक्की मारत दात पडल्याची घटना घडली आहे. शिवाजी नगर येथे असलेल्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कौटुंबिक न्यालयात ही घटना घडली आहे. याबाबद सोलापूर येथे राहणाऱ्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी सचिन विकास पवार , विमाननगर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की फिर्यादी व आरोपी हे पती-पत्नी आहेत. दोघांमध्ये होत असलेल्या वादामुळे दोघेही सद्यस्थितीला वेगवेगळं राहत आहेत. शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.घटनेच्या दिवशी घटस्फोटाच्या दिवशी ते समुपदेशनासाठी न्यायालयात आले होते. त्यावेळी आरोपी पतीने पत्नीला घटस्फोट देण्यास सांगितले. मात्र पतीचे सांगणे मान्य न करत पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला.पत्नीने घटस्फोटास नकार दिल्याचा राग अनावर झाल्याने पतीने पत्नीच्या तोंडावर बुक्की मारली. बुक्कीचा मारा इतका जोरात होता कीत्यात पत्नीचा एक दात पडला तर दुसरा दात अर्धा तुटत पत्नी जखमी झाली. या घटनेचा पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करत आहेत.