पुणे

कार चालवायला शिकत असताना कारवरचा ताबा सुटल्याने कार चालक महिलेचा मृत्यू…

प्रतिनीधी : स्वप्नील कदम

पुणे : पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालविण्यास शिकत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 30 वर्षीय चालक महिलेचा मृत्यू झाला आहे. यात महिलेचा पती मात्र बचावला आहे. करंदी ( ता. शिरूर) येते ही दुर्दैवी घटना घडली आहे. वर्षा दीपक आदक ( वय 30 रा. करंडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. पती दीपक आदक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षा ह्या आपल्या पती दीपक आदक यांच्या सोबत करंदी येथील पऱ्हाडवाडी रोड वर कार शिकण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या वेळी समोरून दोन चाकी आली. त्यावेळी पती दीपक ने त्यांना ब्रेक दाबायला सांगितला मात्र वर्षा यांनी ब्रेक न दाबता कार च्या एक्सीलेटर वर पाय दिला. त्यामुळे कार थेट विहिरीकडे झेपावली या दरम्यान पती दीपक ने वर्षा बसलेल्या बाजूच्या काचेतून तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केले. मात्र वर्षा बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यांच दरम्यान दीपक यांनी कारच्या बाहेर निघत तिला बाहेर काढले. विहिरीतील पाईप ला धरून ओरडल्याने बाजूच्या लोकांनी विहिरीकडे धाव घेतली . मात्र विहिरीतून बाहेर काढल्या नंतर वर्षा यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस घटना स्थळी धाव घेत पाहणी केली.

दरम्यान, या प्रकरणी महिलेचा अपघाती मृत्यू झाला आहे की , काही घातपाताचा प्रकार आहे. हे देखील आत्ता पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप कारंडे व विकास पाटील हे करत आहेत.