पुणे

फुकट बिर्याणी न दिल्याने कोयत्याने वार; तिघांवर गुन्हा दाखल… सिंहगड रोडवरील घटना

प्रतिनिधी :स्वप्नील कदम

पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरून ३ तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने सपासप वार करत हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये हॉटेल मॅनेजर गंभीर जखमी झाला असून हॉटेलचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. ही घटना घडल्यानंतर, हॉटेल चालकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संबंधित घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली आहे.यामुळे रात्री उशिरापर्यंत परिसरामध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास सिंहगड रोड पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मण सोनवणे याचे पुण्यात हिंगणे खुर्द परिसरामध्ये स्वत:च्या मालकीचे हॉटेल आहे. संबंधित हॉटेलमध्ये बिरास्वर दास हे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास सोनवणे यांच्या हॉटेलवर ३ तरुण आले होते. संबंधित तरुणांनी हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास यांच्याकडे फुकट बिर्याणी देण्याची मागणी केली. पण हॉटेल मॅनेजरने आरोपींच्या दबावाला न जुमानता, बिर्याणी देण्यास नकार दिला होता.फुकट बिर्याणी देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आरोपीने मॅनेजरवर कोयत्याने सपासप हल्ला चढविला आहे. या हल्ल्यामध्ये हॉटेल मॅनेजर बिरास्वर दास हे गंभीर जखमी झाले आहे. आरोपी तरुण एवढ्यावरच थांबले नव्हते. तर त्यांनी हॉटेलमधील अनेक वस्तूंची तोडफोड देखील करण्यात आली आहे. आरोपींनी मॅनेजरच्या हातावर कोयत्याने वार केल्यावर, काऊंटरवर असलेले कॉम्प्युटर आणि फ्रिजवर देखील कोयत्याने घाव घालत नुकसान करण्यात आले आहे.

ही घटना घडत असताना फिर्यादी हॉटेल मालक लक्ष्मण सोनवणे बाहेर उभे होते. भांडणाचा आवाज आल्यावर ते धावत हॉटेलमध्ये गेले. याप्रकरणी हॉटेल चालकाने बाळा, तेजा आणि सत्या वानखेडे या ३ तरुणांविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.