पुणे

अट्टल वाहनचोराला हडपसर पोलिसांनी ठोकल्या, बेड्या पाच गुन्ह्याची उकल करीत तीन लाखांचा मुद्देमाल केला जप्त

पुणे, ता. १४ ः अट्टल वाहनचोराला बेड्या ठोकून तीन लाख रुपयांचा मुद्देमाल हडपसर पोलिसांनी जप्त केला. आरोपीकडून पाच गुन्ह्यांची उकल केली.
आशिष श्रीनाथ गायकवाड (वय १९, रा. तक्षशीला बुद्धविहाराजवळ, आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन तपास केला असता आरोपीने आशिष साबळे (रा. मांजरी, पुणे) याच्या मदतीने हडपसर, वानवडी आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीवर तिन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, पुढील तपास पोलीस करीतआहेत.
हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे (गुन्हे) यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सूरज कुंभार, भगवान हंबर्डे यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.