पुणे

महामार्ग साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने भोजन वाटप हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

हवेली पुणे : लोणी काळभोर, पुणे-सोलापूर राष्ट्रीय राजमार्ग, क्रं.६५, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाच्या साफ-सफाई चे काम राष्ट्रीय राजमार्ग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हे काम करण्यासाठी इतर शहरातून महिला-पुरुष साफ-सफाई चे काम करण्यासाठी आलेले आहेत, माणुसकीच्या भावनेतून आज त्यांच्या एक वेळ न्याहरीची सोय संघर्ष युवा प्रतिष्ठान सामाजिक संस्था कदम-वाकवस्ती, लोणी काळभोर, संस्थापक अध्यक्ष विजय बोडके, किरण भोसले, उपाध्यक्ष, अशपाक सय्यद, शुभम बोडके, भगवा प्रतिष्ठान अध्यक्ष अभिजित (पप्पू) बडदे, सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नामुगडे, लहुजी शक्ती सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय सकट , संजय आवारे, अमोल खोले, मनसे उप तालुकाध्यक्ष विश्वजीत काळभोर, रुपेश वानखेडे ,युवराज अंबुरे,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, हवेली पुणे. अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केली, आणि आपल्या गावचा विठ्ठलपंथी वारसा जपला.