पुणे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार

पुणे दि. २९: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशासनाच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामधे योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा तसेच त्यांच्या कुटुंबीयांचा त्यांच्या घरी जावून सत्कार करण्यात आला.

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मधुसुधन रामचंद्र खानवेलकर, अरविंद केशवराव वाकडे आणि जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक कै. अरविंद दांडेकर यांच्या पत्नी वासंती दांडेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले, हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील, मंडळ अधिकारी प्रमोद भांड, तलाठी अशोक शिंदे आदींनी स्वातंत्र्य सैनिकांच्या घरी त्यांची भेट घेऊन सत्कार केला आणि त्यांच्याशी संवाद साधला.