पुणे

गोल्डन सियारा पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांचे कराटे स्पर्धेत यश

हवेली प्रतिनिधी:-अमन शेख

लोणी काळभोर : सातारा येथे १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर दरम्यान सेईको काई कराटे इंटरनॅशनल इंडिया महाराष्ट्र तर्फे घेण्यात आलेल्या ब्लॅक बेल्ट पदवी परीक्षेत कवडीपाट(हवेली)येथील गोल्डन सियारा पब्लिक स्कुल व चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे- डो असोसिएशन इंडिया या अकॅडमी मधून ३० खेळाडूंनी सहभाग नोंदवला. यावेळी परीक्षक म्हणून सेन्साई हेमंत डोईफोडे, सेन्साई प्रदीप वाघोले,सेन्साई राम सोनुने,सेन्साई तेजस वाघोले आदी कराटे प्रशिक्षक उपस्थित होते. यामध्ये गोल्डन सियारा पब्लिक स्कूल कवडीपाट मध्येे शिकत असलेल्या दिव्या चव्हाण,हर्षिका खामकर,नंदिनी चव्हाण,मनिरुद्र शिंदे,कृतिका मगर,तन्वी भिसे,हंसराज वाघमोडे, अनुष्का भोसले या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. हे सर्व खेळाडू चॅम्पियन स्पोर्ट्स कराटे- डो असोसिएशन इंडिया (महाराष्ट्र) या संस्थांतर्गत कराटे मुख्य प्रशिक्षक-सेन्साई हेमंत डोईफोडे यांच्या मार्गदर्शक खाली कराटे प्रशिक्षण घेत आहेत. या परीक्षेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नंदिनी चव्हाण हिला गौरवण्यात आले. या सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन स्कूल कमिटी चेअरमन शैलेश चंद,मुख्याध्यापिका प्रीती खनगे व शिक्षक,सेवकवृंद व पालकांनी केले.