पुणे

महिलेने दारू मागितली म्हणून झाली वादावादीत त्यात महिलेला जोरात धक्का दिल्याने खाली पडून झाला मृत्यू…!

पुणे: प्रतिनिधी ( रमेश निकाळजे )

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे, त्यातच काल एक धक्कादायक घटना घडली आहे, कोंढव्यातील एनआयबीएम परिसरातील मोकळ्या मैदानात एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर दारू मागितल्याच्या कारणावरून या महिलेचा दोघांनी दगडाने ठेचून मारले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट पाच आणि कोंढवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे, यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे,आरोपी जैद आसिफ शेख आणि त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे, मेफेर सोसायटीच्या समोरील मोकळ्या मैदानात 35 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आल्याची माहिती कोंढवा पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली होती.

गुन्हे शाखा युनिट पाच आणि कोंढवा पोलीस तपास करत असताना संशयित आरोपी कौसरबाग भागात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली त्या ठिकाणी पोलीस पथक दाखल झाले व तात्काळ पोलिसांनी त्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले त्यानंतर चौकशी केली असता, आम्ही मोकळ्या जागेत झाडाआड बसलो होतो, तेव्हा तिथे आलेल्या महिलेने मला दारू द्या असे म्हणत वाद घातला, भांडणात तिला धक्का मारल्याने ती खाली पडली, ती जमिनीवर पडली असता आरोपींनी तिच्या डोक्यात दगडाने घाव केला, त्यातच तिचा मृत्यू झाल्याच्या भीतीने आम्ही पळ काढला, अशी कबुली आरोपींनी दिली.

पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.