पुणे

डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी ध्वजारोहण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहर मध्यवर्ती पक्ष कार्यालयात डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजारोहण संपन्न झाले.
यावेळी डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना वर्धापन दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मोठ्या कष्टाने ही पक्षसंघटना वाढवली. भविष्यात या पक्षसंघटनेच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्य जनतेच्या हिताची कामे व्हावी व एका आदर्शवत राष्ट्राच्या निर्मितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोठा वाटा राहील”, अशा सदिच्छा या निमित्ताने दिल्या.

यावेळी बोलतांना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की,”आज १० जून २०२३ रोजी पक्षाचा २४ वा वर्धापन दिन साजरा होत असून , सर्वसामान्य नागरिक ,कष्टकरी,शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून देशाच्या विकासात योगदान देणारा आपला पक्ष २५ व्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे, या निमित्ताने साजरा होत असलेला वर्धापन दिन विशेष महत्वपूर्ण आहे”.

अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या वर्धापन दिनाच्या सोहळ्यास माझ्यासह माजी आमदार डॉ. कुमार सप्तश्री,जयदेवराव गायकवाड, अंकुश काकडे,रवींद्र माळवदकर,दिपक मानकर,प्रदीप देशमुख बाबूराव चांदर, प्मृणालिनी वाणी,किशोर कांबळे, विक्रम जाधव , समिर शेख , डॉं. शशिकांत कदम , योगेश जगताप, दीपक जगताप ,पंकज साठे , सुषमा सातपुते आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.