पुणेमहाराष्ट्र

पुणे : दौंडला मिळणाऱ्या लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न कधी पूर्ण होणार? दौंडकरांचा सवाल…!

पुणे :प्रतिनिधी :रमेश निकाळजे.

पुणे :दौड : राज्यात मागील एक वर्षांपासून एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार ची सत्ता आहे. त्यात वर्षपूर्तीच्या निमित्ताने मंत्रिमंडळाचा विस्तार होणार होता व राहिलेल्या नाराज आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात नक्कीच मंत्रिपद भेटून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न पूर्ण होणार असे वाटत होते.दौंडला तर हमखास लाल दिवा मिळणार असे बोलले जात होते. परंतु काल झालेल्या अजितदादा पवार यांच्या शपथविधीने दौंडच्या जनतेच्या अपेक्षाभंग झाला. आणि दौंडला मिळणाऱ्या लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न स्वप्नच राहिले. आणि पुन्हा दौंड वासियांच्या पदरी निराशा आली.

तत्पूर्वी 1 जुलै रोजी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी यवत येथे पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारत दौंडला (म्हणजेच राहुल कुल ) यांना मंत्रिपद मिळणार का ? हा प्रश्न विचारला होता, आणि यावर कुल यांनी अतिशय सावधानपणे उत्तर दिले होते की सध्या राजकारणात फार मोठ्या घडामोडी चालू आहेत घडामोडी बाबत बोलताना म्हणाले, लाल दिव्या बाबत सांगू शकत नाही, कारण कधी काय होईल हे आत्ताच सांगता येणार नाही.

आणि आमदार कुल यांचे बोल खरे ठरले कारण कुणालाच खरे वाटणार नाही अशा राजकीय घडामोडी काल घडल्या काल दुपारी अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला. आणि त्यामुळे सर्वच आमदारांची गोची होऊन मंत्रिपदाची स्वप्ने भंग पावली. त्यातच दौंडवासियांचे स्वप्न अपुरेच राहिले.आणि दौंड लाल दिवा मिळण्यास बारामती हाच खरा फार मोठा अडथळा आहे, हे पुन्हा एकदा सत्य पुढे आले आहे.

राजकारणातील सर्व नियम,अटी, पक्ष प्रोटोकॉल,गुंडाळत अजित पवार यांनी भाजपा पुढे शरणागत पत्करून उपमुख्यमंत्री मिळविले. तसेच आपल्या पक्षाच्या नऊ लोकांनाही मंत्रिपद मिळवून दिले आहे. आणि दौंडच्या लाल दिव्याला जाणीव पूर्वक लोम्बकळत ठेवले. अशी चर्चा जनतेत होऊ लागली.पुढे होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारत तरी दौंडला लाल दिवा मिळणार का असा प्रश्न मात्र नक्कीच पडला आहे.