पुणे

राज्याच्या बदलत्या राजकारणामुळे शहर व हडपसरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी हडपसरचे आमदार नॉट रिचेबल तर शहर पदाधिकारी मुंबईत

पुणे (अनिल मोरे )

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी होऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पुणे शहर व हडपसर मध्ये दुफळी निर्माण झाली आहे आमदार माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात जाण्याच्या मार्गावर असताना पदाधिकारी मात्र शरद पवार यांच्यासोबत राहतील अशी चिन्हे आहेत मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून “कोणता झेंडा घेऊ हाती” असे म्हणण्याची वेळ आली आहे.

 राज्यात सत्ता संघर्षात अचानक भूकंप झाला अजित पवार यांच्यासह नऊ दिग्गज नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली अजित पवार उपमुख्यमंत्री झाले एकमेकांविरोधात लढलेले व टोकाचा संघर्ष असलेले आजी माजी आमदार आजी-माजी नगरसेवक यांच्या मनात धाकधूक निर्माण झाली आगामी निवडणुकीत कोणाची आघाडी होणार युती होणार उमेदवारी कोणाला मिळणार या सर्व गोष्टींचा संभ्रम निर्माण झाला पर्यायाने कार्यकर्त्यांची देखील मोठी गोची झाली आहे.

 पहिल्या दिवशी वडगावशेरी चे आमदार सुनील टिंगरे, सुनील शेळके हे अजित पवार यांच्या गटात सहभागी झाले, हडपसर चे आमदार चेतन तुपे यांच्या बाबतीत मात्र अद्याप संभ्रम आहे ते कोणत्या गटात सामील होणार त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात पदाधिकाऱ्यांमध्ये देखील मोठा संभ्रम आहे या सगळ्या घडामोडीतून दोन गट निर्माण होऊन हडपसर मध्ये ही दुफळी निर्माण होणार असल्याची चिन्हे आहेत.

 

अजित दादांच्या गटात गेल्यास मुस्लिम मतांचा फटका….

 हडपसर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार लक्षणीय आहे मुस्लिम मतदार मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभा राहिल्याने चेतन तुपे आमदार म्हणून निवडून आले हा मतदार भाजपच्या विरोधात असल्याने जर चेतन तुपे अजितदादा गटात गेले तर मुस्लिम समाज नाराज होऊ शकतो ही नाराजी भविष्यातील राजकारणाला परवडणारी नाही, त्यामुळे ही शक्यता लक्षात घेऊन आमदार तुपे शरद पवार साहेबांसोबत राहतील असा कयास बांधला जात आहे.

 पुणे शहर पदाधिकारी साहेबांच्या भेटीला तर हडपसर विधानसभा मतदारसंघातील काही पदाधिकारी अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचे सूत्राकडून कळते.

 

 सर्व पक्षांचे स्पर्धक एकाच युतीत सामील…..

 भारतीय जनता पार्टी कडून माजी आमदार योगेश टिळेकर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत त्यातच शिंदे गटात सामील झालेले माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांना विधानसभा निवडणूक लढवायची आहे आमदार चेतन तुपे जर अजित पवार यांच्या गटात सामील झाले तर टिळेकर व भानगिरे यांच्या वाट्याला उमेदवारी येणार का यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या सगळ्या घडामोडीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मात्र चांगले दिवस येणार आहेत कारण माजी आमदार महादेव बाबर यांना उमेदवारी मिळाल्यास तो एक सक्षम पर्याय निवडणुकीच्या रिंगणात असेल.