पुणे

“सतत वाहतूककोंडी होणाऱ्या हडपसर ची समस्या कधी सुटणार?, “हडपसरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रमोद भानगिरे यांच्याकडून केंद्रीय मंत्र्यांना साकडे”

 

पुणे, (सतीशः भिसे ) सोलापूर महामार्गावरील हडपसर गाडीतळ चौकातील संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज उड्डाण पुलामुळे वाहतुककोंडी सुटण्याऐवजी जटील बनत आहे. त्यामुळे हडपसरमधील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष प्रमोद भानगिरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले.

 

भानगिरे यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की, आपल्या नेतृत्वात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय देशभरात विविध ठिकणी रस्ते आणि महामार्गाची कामे अत्यंत वेगाने सुरु आहेत. अनेक वर्षे रेंगाळलेल्या रस्त्यांची कामे आपल्या नेतृत्वात कमी कालावधीत पूर्णत्वास येत आहेत, त्याबद्दल आपले सर्वप्रथम मनःपूर्वक आभार. मात्र, मागिल अनेक वर्षापासून पुणेकरांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा प्रश्न आपण विक्रमी वेळेत सोडवला. नितीन गडकरीजी चांदणी चौकासारखाच वाहतुकीचा प्रश्न पुणे महानगरातील हडपसर उपनगरात असलेल्या संत ज्ञानेशवर आणि संत तुकाराम उड्डाणपूलामुळे नागरिकांना सतावतोय.

 

या उड्डाणलापासून राष्ट्रीय महामार्ग क्र.65 (जुना क्र.9) पुणे ते मच्छलीपट्टणम सुरु होतो. या महामार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये जोडली गेली आहेत. त्यामुळे हडपसरच्या या उड्डाणपुलावरून मोठया प्रमाणात सातत्याने वाहतूक असते. मुळात एकच असलेल्या या पूलाला पुढे सासवड रस्त्यावर जाण्यासाठी वेगळा मार्ग बांधण्यात आला. या जोडकामामुळे मुळातील पूल अत्यंत कमकुवत झाला आहे. परिणामी आठवड्यातील चार ते पाच दिवस उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागत आहे.