पुणे

हे सरकार झोपले आहे का?- अमित ठाकरे

पुणे: मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या (Swapnil Lonkar) कुटूंबियांची भेट घेत आर्थिक मदत केली आहे. महाराष्ट्र सरकार मधील 2 लाख पद रिक्त आहे हे सरकार झोपले आहे का असं काही पाऊल उचलल्या नंतर सरकार जागे होणार आहे का? असा सवाल करीत सरकारवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. ठाण्याचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांच्यावतीनं 2 लाखांचा चेक मनसे नेते अमित ठाकरे यांनी स्वप्नील लोणकरच्या कुटुंबाला दिला आहे. त्याच बरोबर पक्ष नेहमी पाठशी राहील अस आश्वासन ठाकरे यांनी दिल आहे.

स्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. आशा भेटू देऊन आमचा प्रश्न सुटणार नाहीये. आयुष्यभर आम्हाला रडतखडत जगावं लागेल आम्हाला भेटण्यापेक्षा भरती करा, आणि विद्यार्थ्यांना नोकरी द्या आम्हाला आमचा मुलगा नोकरीला लागला असं वाटेल. आमच्या मुलांचं बलिदान गेलंय, त्यामुळे जाग तरी आली अमित ठाकरे आम्हाला भेटून गेले आणि सगळी मदत करणार आहे असं सांगितलं आहे, त्यांनी चेक दिला आहे.

स्वप्नीलची आई छाया लोणकर यांनाही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.दरवर्षी भरती निघते, जागा असते म्हणून निघते ना फक्त पैसे गोळा करण्यासाठी करतात का ? आता जर स्वप्नीलला न्याय द्यायचा असेल तर भरती करा, अनेक स्वप्नील सरकारने वाचवले तर बरं आहे नाही भरती झाली तर असे अनेक स्वप्नील जातील.

0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Comment here

0
Would love your thoughts, please comment.x
()
x