पुणे

लोणी काळभोर येथील स्वतंत्र अपर तहसील कार्यालयाचा तहसीलदार सुरवसे यांच्याकडे पदभार

प्रतिनिधी- स्वप्नील कदम

लोणी काळभोर-येथे होणा-या स्वतंत्र अपर तहसिल कार्यालयाचा अतिरीक्त- पद‌भार पूढील आदेश होई पर्यंत हवेली तहसिलदार किरण सुरवसे यांच्या- कडे सोपवण्यात आला आहे. या स्वतंत्र अपर तहसिल कार्यालयाचा पूढील आदेश होईपर्यंत किरण सुरवसे यांना कामकाज पाहण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी काढला आहे.

 

हवेली तालूक्याचे वाढते शहरीकरण लक्षात घेऊन व वाढल्या प्रशासकीय कामकाजामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने हवेली तालूक्यातील लोणी काळभोर येथे स्वतंत्र अपर तहसिल कार्यालय स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे.

 

स्वतंत्र अपर तहसिलदार लोणी काळभोर कार्यालयाचा पदभार स्वीकारण्यासाठी हवेली तालुक्याचे तहसिलदार किरण सुरवसे यांच्याकडे अपर तहसिलपदाची तर हवेली तहसिलदार कार्यालयातील महसूल सहायक म्हणून रामदास अनंता डामसे यांची नेमनूक करण्यात आली आहे.