पुणे

साहित्यिक, विचारवंत यांनी भूमिका घेऊन निर्भीडपणे व्यक्त व्हायला हवे : सुभाष वारे अण्णासाहेब मगर महाविद्यालयात प्रा. हरी नरके यांना आदरांजली

हरी नरके यांनी पुस्तकं वाचण्या, लिहिण्याबरोबरच समाज वाचत सत्यशोधन केले. आज सत्यशोधक विचार, संविधानाला सुरुंग लावण्याच्या काळात साहित्यिक, विचारवंत यांनी भूमिका घेऊन निर्भीडपणे व्यक्त व्हायला हवे. मनुवादी संस्कृती, विधिनिषेध यामुळे आपला देश मागास राहिला आहे. म्हणून आजपासून आपल्या घरी पुरोहित येऊ देऊ नका असा संकल्प करा असे आवाहन संविधान अभ्यासक सुभाष वारे यांनी केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जेष्ठ विचारवंत, साहित्यिक, वक्ते प्रा. हरी नरके आदरांजली अर्पण करण्यासाठी मराठी विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सुभाष वारे बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी हरी नरके यांचे वक्तृत्व, अभ्यासू वृत्ती व चिकाटी हे गुण विद्यार्थ्यांनी घ्यावेत असे सांगितले.

 

माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी हरी नरके यांनी माझ्या विरुद्ध विठ्ठल तुपे यांचा प्रचार केला आणि मी निवडणूक हरलो. त्याकाळी ज्याच्याकडे चांगला वक्ता तो निवडणूक जिकायचा.

माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरेश घुले यांनी हरी नरके यांनी समता परिषद, ओबीसी आरक्षण, फुले शाहू आंबेडकर ग्रंथ निर्मिती या विषयी भरीव कामगिरी केल्याचे सांगितले.

तसेच माजी सरपंच विलास तुपे, माजी नगरसेवक सुनील बनकर, साखर संकुलचे सह संचालक शिरीष तळेकरी, डॉ. शोभा पाटील, प्राचार्य महादेव वाल्हेर, पूजा नरके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या प्रसंगी दत्तू नरके, वाय.जी. पवार, सुभाष काळभोर, अरुण झांबरे, कृष्णकांत कोबल, नितीन आरु, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. अनिल जगताप, प्रा. विलास शिंदे आजी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा.नितीन लगड व प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत मुळे यांनी मानले.