पुणेबारामती

Breking news : राज्यात होणार पुन्हा मोठा भूकंप? शरद पवारांच्या वक्तव्याने सगळेच कार्यकर्ते व राज्यकर्ते संभ्रमात, काय होणार पुढे…?. पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

बारामती: मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय वेगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. तसेच मोठ्या राजकीय उलथापालथी देखील होत आहेत. त्यामध्ये काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले की “अजित पवार आमचेच आहेत”. “पक्षात कसलीच फूट पडली नाही” यांच्या एका वक्तव्यामुळे सगळेच अचंबित झाले आहेत. कारण कालपर्यंत अजित पवार यांच्याविरोधात बोलणारे, शरद पवार यांनी आज अचानक यू टर्न घेतला असून एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सगळेच संभ्रमात पडले आहेत. पवारांची नक्की भूमिका काय यावर विरोधकांच्या देखील विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

 

शरद पवारांनी बीड, परळी, येवला या सभानंतर शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी हसन मुश्रीफांच्या कोल्हापुरात सभा घेणार आहेत. आजच दसरा चौकात पवारांची सभा होणार आहे. मात्र या सभेच्या अगोदरच शरद पवारांनी मोठे वक्तव्य केल्यामुळं नेमके काय चाललंय अशी चर्चा सुरु आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, पवारांच्या या वक्तव्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून, पवारांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. त्यांना कायदेशील लढाई लढायची नसेल. दरम्यान, आता पवारांच्या वक्तव्यानंतर कदाचित शरद पवारांना कायदेशीर लढाई नसेल म्हणून त्यांनी हे वक्तव्य केलं असावं, अस ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी म्हटलं आहे. ते नेहमी द्विअर्थी बोलत असतात – दरेकर पवार हे नेमही द्विअर्थी बोलत असतात, कारण पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक, आणि त्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे. हे कोणालाच माहित नसते. त्यामुळं आत्ताच त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ सांगता येणार नाही, असं भाजपा नेते प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

पवार लवकरच मोदींना पाठिंबा देतील. बावनकुळे म्हणाले , थोड्याच दिवसांत शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न राजकारणात रस असणाऱ्यांना पडू लागला आहे. त्यामुळं रद पवार आणि सुप्रिया सुळे देखील मोदी सरकारला पाठिंबा देतील, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. स्वार्थासाठी अनेक लोक बरबटले आहेत – विजय वडेट्टीवार शरद पवार यांच वक्तव्य देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना विचारला तर बरं. आज राजकारण अस्थिर झाल आहे. शब्दावर अश्वासनावर विश्वास कोणी ठेवू शकत नाही. भाजपाने राजकारण नासवलं आहे. जनतेचा विश्वासघात केला, त्यांना जनता जागा दाखवेल, निवडणूक मैदानात स्पष्ट होईल. त्या पक्षाबद्दल आम्ही बोलणं योग्य नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत, कोर्टात केस सुरू होईल, म्हणून त्यांच्या स्ट्रॅटजीचा तो भाग असू शकतो. प्रत्येक पक्ष काम करताना अनेकदा शेवटच्या क्षणी फूट पडते, त्यावर ते आपला प्लॅन बी ठेवतात. कोण कुठे जातं हे निवडणुकीत स्पष्ट होईल. आम्हाला धोका वाटण्याचं कारण नाही. शेवटच एकच उत्तर असेल, निवडणुकीच्या तारखेपर्यंत जे ठरेल ते त्यावेळी परिस्थिती दिसेल. असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

सुप्रिया सुळें यांनी आधी सांगितले होते की आमच्यात फूट पडली नाही. त्यानंतर आता शरद पवार काल सांगितले की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात फूट नाही. “अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत”, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं व धक्कादायक वक्तव्य केलं आहे. त्यामुळं सर्वाचाच भुवया ‘उंचावल्या असून, शरद पवारांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सळे यांनी म्हटलं, असा प्रश्न विचारला असता, “शरद पवार म्हणाले, बरोबर आहे, आमच्या पक्षात फूट नाही, अजित पवार आमचेच नेते आहेत. पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. वेगळा निर्णय घेतला आहे. जो त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे. पण याचा अर्थ पक्षात फूट असा होत नाही. पक्षात फूट केव्हा होते, जेव्हा पक्षातील मोठा वर्ग बाहेर गेला तर पक्षात फूट होते. असं शरद पवार म्हणाले.” यामुळं राजकीय क्षेत्रातून याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एक मोठा भूकंप होणार हे मात्र खरे आहे असे जाणकारांचे मत आहे.