पुणेमहाराष्ट्र

4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास नागरिकांनी दिला चोप आणि केले पोलिसांच्या हवाली…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : कोथरूड मधील सागर कॉलनी येथे घराबाहेर खेळत असलेल्या 4 वर्षाच्या मुलीला राजेश चोरगे नामक व्यक्ती चॉकलेट देतो असे सांगून बाहेर घेऊन गेला.आणि तेथे जवळच उभ्या असलेल्या बसखाली तिला घेऊन गेला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही 4 वर्षाची मुलगी ओरडली. तिचा आवाज ऐकून जवळ असणाऱ्या लोकांनी त्या नराधमाला पकडले.

आणि चांगला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. राजेश चोरगे (वय ३०, रा. सागर कॉलनी, कोथरुड ) असे या नराधमाचे नाव आहे. कोथरुड पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी सकाळी साडेसात ते साडे नऊ वाजण्याच्या दरम्यान शांतीबन चौकाजवळील रोडलगत उभा असलेल्या बसच्या खाली घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 4 वर्षांची नात घराबाहेर खेळत होती.

या नराधमाने त्यांच्या 4 वर्षाच्या नातीला घेऊन तो शांतीबन चौकात आला. तेथे उभ्या असलेल्या बसच्या खाली तिला नेले. तिला खाली झोपवून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करु लागला. त्यामुळे ही चिमुरडी जोरजोरात रडू लागली. तेथून जाणार्‍या लोकांनी मुलीचा आवाज ऐकून बसखाली वाकून पाहिल्यावर या नराधमाचे काळे कृत्य समोर आले. लोकांनी त्याला बसचे खालून बाहेर काढून चांगला चोप दिला. आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण करीत आहेत.