पुणेमहाराष्ट्र

तरुणीला लग्नाच्या आमिषाने पळवले, नंतर मात्र लग्न करण्यास दिला नकार; 19 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : पुण्यातील उरुळी देवाची येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय तरुणीला लग्नाच्या अमिषाने पळवून नेले तसेच तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून .आणि त्यानंतर मात्र तीला लग्न करण्यास नकार दिला. या सर्व प्रकाराने धक्का बसल्याने 19 वर्षीय तरुणीने उरुळी देवाची येथील मामाच्या घरी जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार 24 नोव्हेंबर रोजी लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उरुळी देवाची परिसरातील धनगर वस्ती येथे घडला.

आदित्य अशोक जाधव (रा. राजुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे) त्याच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रतीक्षा आणि आदित्य हे एकाच गावातील असल्यामुळे त्यांचे मागील 2 ते 3 वर्षांपासून प्रेम संबंध होते. त्यामुळे दोघांनी पळून जाऊन लग्न करू असे ठरवून पळून गेले.

परंतु आदित्यने लग्नाला नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या प्रतिक्षाने हडपसर-सासवड रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात मामाच्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. उरुळी देवाचीमध्ये शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास लोणीकाळभोर पोलिस करत आहेत.