पुणे

विधिसंघर्षित बालकाच्या मदतीने वाहन चोरट्यांना ठोकल्या बेड्या कोंढवा पोलिसांची पिसोळीतील आंबेकर चौक आणि खडी मशीन चौकात कारवाई

पिसोळी (ता. हवेली) आंबेकर हॉटेल चौक येथे विधिसंघर्षित बालकाच्या मदतीने ८ वाहने चोरणाऱ्या दोघांना बेड्या टोकून आठ दुचाकी जप्त केल्या. मन्सूर पाटोदे (वय १९, रा. संभाजी बारणेंच्या ऑफिसच्यामागे शिवतीर्थनगर, थेरगाव, पुणे), सौरभ असे अटक केलेल्याचे नाव असून, सौरभ राजेंद्र भोसले (वय २३, रा. कोर्टी, सवडी, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नाव असून, विधिसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे.

कोंढवा पोलीस स्टेशनचे पथक पिसोळी (ता. हवेली) येथील आंबेकर चौक आणि खडी मशीन चौकात संशयावरून तपास केला असता, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये विविध गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संदीप भोसले व संदीप मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, पोलीस अंमलदार सतीष चव्हाण, विशाल मेमाणे, निलेश देसाई, लवेश शिंदे, सागर भोसले, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, सुजीत मदन, शाहीद शेख यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील करीत आहेत.