पुणेमहाराष्ट्र

आंगणवाडी सेविकांच्या संपास मराठी पत्रकार संघ हवेली तालुका तसेच काँग्रेस आय पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा…!

प्रतिनिधी : स्वप्नील कदम

लोणी काळभोर -येथे आज आंगणवाडी बीट लोणी काळभोर-( १ )च्या वतीने महाराष्ट्र सरकार तसेच प्रकल्प उरुळीकांचन यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्यावेळी मराठी पत्रकार परिषद संलग्न मराठी पत्रकार संघ हवेली तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. त्यावेळी तालुका अध्यक्ष -रमेश निकाळजे, उपाध्यक्ष -स्वप्नील कदम, संघटक राम भंडारी, शहाजी मिसाळ, नामदेव घळगे उपस्थित होते. तसेच काँग्रेस आयच्या महिला पुणे जिल्हा अध्यक्ष किरण काळभोर यांनीही जाहीर पाठिंबा दिला.

महाराष्ट्रातील, २ लाख ३२हजाराच्या वर अंगणवाड्या व सेविका मदतनीस ४ डिसेंबर पासून आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संपावर आहेत. नागपूरला झालेल्या अधिवेशनात त्यांच्या मागण्यांवर कसल्याही प्रकारे तोडगा न निघाल्याने सध्या सेविका आणि मदतनीस यांच्याकडून सर्वत्र जेलभरो आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारवर चांगलेच दडपण आले असून त्यांचा संप मोडीत काढण्यासाठी सरकार सर्व प्रकल्प तसेच ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना आंगणवाडी उघडून खाऊ वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु ग्रामसेवक संघटना महाराष्ट्र राज्य यांनी तसेच ग्रामपंचायत यांनी त्यांच्या संपाला पाठिंबा दिल्याने सर्व जबाबदारी प्रकल्प अधिकाऱ्यांवर आल्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प उरुळी कांचन यांचे प्रकल्प अधिकारी तसेच पर्यवेक्षिका यांच्याकडून लोणी काळभोर बीट मधील ७ अंगणवाडी मदतनीस यांच्या घरी जाऊन तुम्ही नवीन कामाला लागला आहात, जर तुम्ही अंगणवाडी उघडली नाही तर तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल तुम्ही जर आंगणवाडी उघडली तर तुमचा पगार निघेल, असे लोणी काळभोर च्या पर्यवेक्षिका धनश्री नायर यांनी लालचही दिले.

तसेच अवेळी म्हणजे सायंकाळच्या वेळी त्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीसा दिल्या आहेत. वास्तविकता या नोटीसा प्रकल्प अधिकाऱ्यांनी पोस्टाने पाठविणे गरजेचे होते.किंवा शाळेच्या वेळेत हे काम करायला हवे होते परंतु तसे न करता संप मोडीत काढण्याच्या उद्देशाने काही मदतनीस यांना घरी जाऊन व काहींना फोनवरून पर्यवेक्षिका नायर यांनी गैरमार्गाने धाकदडपशाही करून नवीन आंगणवाडी मदतनीस यांना आंगणवाड्या सुरु करा अशा धमक्या दिल्या जातात. याविषयी उरुळीकांचन चे प्रकल्प अधिकारी धुमाळ यांना पत्रकार संघाचे संघटक राम भंडारी यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली गेली. त्यांना नंतर फोन केला असता त्यांनी फोनच घेतला नाही. त्यामुळे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प वरिष्ठ अधिकारी पुणे जिल्हा( CO )यांनी धमकीप्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पर्यवेक्षिका धनश्री नायर यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीबीट लोणी काळभोर -१ च्या सर्व सेविका -मदतनीस यांच्याकडून करण्यात आली आहे.