पुणेमहाराष्ट्र

धक्कादायक : वानवडी भागात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचा उच्चभ्रू सोसायटीच्या आवारात मद्यधुंद अवस्थेत राडा…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : वानवडी भागात एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मद्यधुंद अवस्थेत तरुणीने मोठा राडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. वानवडी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या मद्यधुंद मुलीने सोसायटीच्या आवारात गोंधळ घातल्याची घटना उघडकीस आली आहे. मद्यधुंद तरुणी एका पोलीस निरीक्षक अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली असून, याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिकऱ्याची मुलगी थर्टीफर्स्ट च्या रात्री सोसायटीच्या गेटवर आली असता तीला वाचमेन ने अडवल्याच्या रागातून तिने वाचमेन ला शिवीगाळ केली तसेच केबिनच्या काचा फोडल्या, तसेच टेबल खुर्ची फेकून दिले. वास्तविक पाहता पोलीसाच्या घरातील सदस्याकडून असे वर्तन होणे फारच गैर आहे. कारण जे समाजाला कायदा व नियम समजावून सांगून शिस्त लावण्याचे काम करत असतात त्यांच्याच घरातील सदस्याकडून असे नियम धाब्यावर बसवून राडा करणे, गोंधळ घालणे योग्य नाही.

शेवटी कायदा हा सर्वांना समान आहे. तीने जास्तच नशा केल्याने तिचे स्वतःवर कसलेच नियंत्रण न्हवते. त्यामुळे तरुणीचा आरडाओरडा ऐकून सोसायटीतील सर्व लोकं जमा झाले. त्यातील बऱ्याच लोकांनी तीला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु मद्यधुंद अवस्थेतील तरुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.तिची आई खाली येऊन तीला समजावत होती. परंतु तिचा गोंधळ सुरूच होता. त्यामुळे शेवटी पोलिसांना याची माहिती देवून पाचारण करण्यात आले.

पोलीस तेथे दाखल झाल्यावर तिने पोलिसांनाही दमदाटी केली. त्यामुळे पोलिसांनी लेडीज पोलीस बोलावून तीला ताब्यात घेतले. या घटनेचे चित्रीकरण सोसायटीतील CCTV कॅमेऱ्यांत मिळाले आहे.त्यामुळे सोसायटीतील लोकांकडून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता तिच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे आहे. सदरील प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वानवडी पोलीस करत आहेत.