पुणे (रोखठोक महाराष्ट्र ऑनलाईन)
शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आलेले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी कामाचा धडाका सुरू केला असून पहिल्याच भेटीत पुण्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन प्रश्न मांडणार आहेत.
यासंदर्भात माहिती देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर त्यांना हडपसर विधानसभा मतदारसंघ व परिसरातील नागरी प्रश्नांबाबत माहिती दिली आहे, पुणे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महावितरणचे अधिकारी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या परिसरातील समस्यांबाबत निवेदन दिले जाणार आहे.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील नागरी प्रश्नांबाबत चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच महापालिका राष्ट्रवादी कार्यालयात बैठक झाली या बैठकीमध्ये श्री. तुपे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन करत मतदारसंघातील नागरी प्रश्नांबाबत लेखी सूचना करण्याची सूचना दिली. होती या सर्व सूचना व मागण्या डॉ.अमोल कोल्हे यांच्या मार्फत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, महावितरणचे अधिकारी व पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे तसेच नागरी प्रश्न सोडविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे
डॉक्टर कोल्हे यांचा हडपसर मध्ये नागरी सत्कार
शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडून आल्यानंतर मतदार संघातील विधानसभा मतदारसंघनिहाय डॉ. कोल्हे यांचा संपर्क दौरा सुरू असून हडपसर विधानसभा मतदार संघाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात येणार आहे गांधी चौक येथे होणाऱ्या सत्कारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिली.
शिवराज्याभिषेक दिनीच डॉ.अमोल कोल्हे संसदेत दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेल्या डॉ. अमोल कोल्हे शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. खासदार झाल्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हे यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेत पाऊल ठेवल आहे. संसदेत जाताच कोल्हे यांनी सर्वप्रथम तेथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन आनंद व्यक्त केला आहे. तसेच शिवराज्याभिषेकदिनी संसदेत आपले पाऊल पडल्याचेही कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन म्हटले आहे.
संसेदत पोहोचल्याचा मनस्वी आनंद त्यांनी व्यक्त केला आहे. ”छत्रपतींच्या मावळ्याचं “संसदेत”आज पहिलं पाऊल आणि मुहूर्त “शिवराज्याभिषेक दिनाचा”! अभिमान, कृतज्ञता आणि जबाबदारी!!!, असे म्हणत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्याचा फोटो फेसबुक वर शेअर केला आहे.
