पुणेमहाराष्ट्र

ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशन कडून मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई…!

पुणे : प्रतिनिधी : रमेश निकाळजे

पुणे : रविवार पेठ भोरिआळी येथे एनिमल फ्रेंड्स फाउंडेशन टीमकडून मांजाची अनधिकृत पणे विक्री करत असलेल्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. कारवाई करत असतानाच त्याच ठिकाणी मांजा मधेच अडकलेली घार आढळून आली. त्या ऍनिमल फ्रेंड्स टिमने मांजा मध्ये अडकलेल्या घारीस सुरक्षित बाहेर काढून पुढील उपचारासाठी प्राणी संग्रहालयातील उपचार केंद्रात पाठवण्यात आले. तसेच नागरिकांनाही मांजा वापरू नये असे आवाहन करण्यात आले. सदरील करावाई करत असताना ऍनिमल फ्रेंड्स फाउंडेशनचे अध्यक्ष अनिकेत काबळे आणि त्यांचे सहकारी अतिष अग्रवाल, गौरव अवचिते, तनिष्क डैथनकर, वीरेंद्र कुंवर, आदित्य अग्रवाल इत्यादी उपस्थित होते.