पुणेमहाराष्ट्र

एमपीडीएंतर्गत कारवाईचे एका वर्षात शतक पोलीस आयुक्तांची ऐतिहासिक कामगिरी ः

पुणे, दि. १ ः हडपसर पोलीस स्टेशनअंतर्गत दहशत माजविणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत एका वर्षात शतक पूर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी पुणे पोलीस आयुक्तांनी केली. राजू हनुमंत गायकवाड (वय ३९, रा. गंगानगर, हडपसर, पुणे) असे एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केलेल्याचे नाव आहे.

 

पोलिसांनी सांगितले की, गायकवाड याच्यावर मागिल चार वर्षांमध्ये सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पीसीबी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू बहिरट, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेखर कोळी, दिलीप झानपुरे, योगीराज घाटगे, अविनाश सावंत, संतोष कुचेकर, सागर बाबरे, अनिल भोंग यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे आयुक्तालयाचा कारभार स्वीकारल्यानंतर अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेच्या एका वर्षांत १०० आरोपींना विविध कारागृहामध्ये स्थानबद्ध करण्यात आले आहे.