पुणे

क्रिकेटच्या जमान्यात पारंपरिक खेळालाही महत्त्व द्या डॉक्टरांचे मत ः हडपसर मेडिकल असोसिएशन व झेड प्लस ॲक्सिडेंट हॉस्पिटलतर्फे खेळाचे आयोजन

पुणे, दि. १० ः मोबाईल, सोशल मीडिया आणि क्रिकेटबरोबर आता विटी-दांडू, भवरा, गोट्या, अन लिंगोर अशा पारंपरिक जुन्या खेळ महत्त्वाचे आहे. मैदानावरच्या खेळाची गोष्ट काही औरच आहे. या खेळातून आनंद आणि व्यायाम सहजात मिळतो, असे मत हडपसरमधील डॉक्टरांनी व्यक्त केले.
हडपसर मेडिकल असोसिएशन आणि झेड प्लस ॲक्सिडेंट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. ४ फेब्रुवारी) हुरडा पार्टी, विस्मृतीत गेलेल्या भारतीय पारंपरिक खेळांचे शिबीर आयोजित केले होते. यावेळी डॉक्टर कुटुंबीयांचे पारंपरिक पद्धती वाद्य संबळाने स्वागत करण्यात आले. डॉ. सचिन आरू, नवनाथ झांजुर्णे, डॉ. अतुल होळे, डॉ. कळमणकर, डॉ. रसिक झांजे यांनी विशेष सहभाग नोंदवला. यावेळी पेंडसे सरांनी विद्यार्थ्यांकडून प्रार्थना म्हणून घेतली. त्यानंतर PT च्या तासाला खेळायची परवानगी दिली. डॉ. स्मिता झांजुर्णे यांच्यासह सर्वच महिलांनी खेळ सुरू केले होते. डॉ. सतीश सोनवणें आणि डॉ. मनिषा सोनवणे यांनी चिमुकल्यांबरोबर वेगळ्या खेळाचा डाव मांडला होता.

डॉ. माने व डॉ. राहुल झांजुर्णे यांनी ९० जणांचे दोन गट तयार करून विट्टी दांडू, गोट्या, लिंगोरचा, टायर, पतंग, रस्सी, भोवरे आदी खेळांचा आनंद जिंकल्यानंतरचा जल्लोष, आरोळ्या, हरल्यानंतरची चिडवाचिडवी असा सारा खेळच खेळ सुरू राहिला. यावेळी लगोरचा फुटल्यानंतर चुकून दुसऱ्याच टीम मधल्या खेळाडू ला बॉल फेकून मारल्यानंतर त्याची पाठ चांगलीच सडकून निघत होती. दुसरीकडे आटपाडकर यांनी महिला अन मुले शाळेच्या छतावर नेऊन लगेच, पतंगी वाऱ्यावर सोडल्या अन् काटाकाटी सुरु केली होती. एक डोळा बंद करून नेम धरून रिंगणातल्या गोट्या जिंकायचा धडाका होळे पाटलांनी लावला होता. झांजे सरांनी दांडूने विट्टी कोलताना उलटे उभे राहून कोलायची ट्रीक शिकवली. काही लोकांना खेळाचं साहित्य कमी पडलं तर त्यांनी रुमाल डोळ्याला बांधून आंधळी कोशिंबीर खेळायला सुरु केलं. काही महिलांनी बुटाच्या लेसने दोन पाय जोडून तीन पायाची रेस सुरु केली.

पोत्यात पाय घालून पळायच्या रेसची तर जवळपास ७-८ आवर्तन झाली. रस्सीखेच पुरुषांची झाली तशी स्त्रीयांची आणि मुलांचीही झाली. महिला विरुद्ध पुरुष अशी अंतिम मॅच सुरू झाली. पुरुष गटाचे नेतृत्व आयर्नमॅन डॉ. राहुल झांजुर्णे आणि स्त्रियांचे नेतृत्व आयर्नमॅन डॉ. स्मिता झांजुर्णे यांनी केले.
दरम्यान, १५० प्रश्नांची क्वीझ घेतली, त्यामधील विजेत्यांना खाऊची पुडी देण्यात आली. डॉ. रसिक गांधी सरांनी काही खेळ घेतले.