23 आमदार भाजपाच्या वाटेवर? साताऱ्यातील मंत्रीही चर्चेत!

Rokhthok Maharashtra 19 0

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील तब्बल 23 आमदार भाजपसोबत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे या आमदारांमध्ये काही विद्यमान मंत्र्यांचाही समावेश असल्याचे बोलले जात असून सातारा जिल्ह्यातील एका मंत्र्याचे नावही चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या इच्छुक नेत्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजप नेतृत्वाने हा प्रस्ताव सध्या होल्डवर ठेवल्याची माहिती समोर येत आहे.
जर हे राजकीय समीकरण प्रत्यक्षात आले, तर 2029 च्या निवडणुकांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.