90 व्या वर्षी मिळणार 100% पेन्शन? केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी!

Rokhthok Maharashtra 2 0

केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगांतर्गत पेन्शन व्यवस्थेत मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
नवीन प्रस्तावानुसार, वय वाढत जाईल तशी पेन्शनही वाढणार आहे. 65 व्या वर्षी 70 टक्के, 70 व्या वर्षी 75 टक्के, 75 व्या वर्षी 80 टक्के, तर 90 व्या वर्षी शेवटच्या पगाराच्या तब्बल 100 टक्के पेन्शन मिळू शकते.
याशिवाय सध्याची 50 टक्के पेन्शन मर्यादा वाढवून ती 67 टक्क्यांपर्यंत नेण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना OPS, NPS आणि UPS या तीन पेन्शन योजनांपैकी एक योजना निवडण्याचे स्वातंत्र्यही मिळू शकते.
या शिफारशी लागू झाल्यास देशातील 1 कोटी 10 लाखांहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.

© Rokhthok Maharashtra News. All Rights Reserved.