हडपसर

सचखंड श्री तख्त साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून बचुसिंग टाक यांचा गौरव

खालसा पंथाचे नाव उज्वल करण्याचे काम बच्चूसिंग टाक यांनी केले : सरदार डी.पी सिंगजी

हडपसर (प्रतिनिधी)

हडपसर मधील जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांचा सचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून नुकताच मोठा गौरव करण्यात आला.

सचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड बोर्डचे सुप्रीडेंट सरदार गुरविंदरसिंग वादवा, सरदार डीपी सिंगजी,सरदार अवतारसिंग पहरेदार,ग्यानी तेगासिंग,सरदार बलजितसिंग या शीख समाजातील मान्यवरांच्या हस्ते बच्चूसिंग टाक यांना मानाची पारंपरिक पगडी घालून धर्मग्रंथ,शाल,श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

सचखंड श्री तखत साहेब गुरुद्वारा नांदेड यांच्याकडून गौरव होणे हे शीख समाजात अतिशय अभिमानाचे समजले जाते.यावेळी बोलताना सरदार डीपी सिंगजी म्हणाले’पुणे शहर परिसरात बच्चूसिंग यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शेकडो जणांचे प्राण वाचवले आहेत,त्यांनी आपल्या समाजातील खालसा पंथाचे नाव उज्वल करण्याचे काम केले आहे.गुरू ग्रंथ साहेब यांनी दिलेल्या विचारांवर श्रद्धा ठेवून बच्चूसिंग टाक हे समाजासाठी काम करत आहेत अशा शब्दांत त्यांनी कौतुक केले.

या गौरवाबद्दल श्रावनसिंग रजपूत, अजमेरसिंग टाक,पपुसिंग टाक,चत्तरसिंग परदेशी यांच्यासह पुणे व हडपसर परिसरातील विविध स्थरांमधील मान्यवरांनी व नागरिकांनी बच्चूसिंग टाक यांचे अभिनंदन केले आहे.

0 0 votes
Article Rating
1.2K Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments