पुणे

पाण्यासाठी पालिकेचा पूर्व भागावर अन्याय ; नगरसेवक नाना भानगिरे

‎हडपसर /पुणे (रोखठोक महाराष्ट्र प्रतिनिधी)
पुणे महानगरपालिकेने पूर्व भागावर पाण्याच्या बाबतीत कायम अन्याय केलेला आहे महंमदवाडी या प्रभागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई पावसाळ्यापूर्वी जाणवत असताना स्वखर्चातून टँकरद्वारे पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहे, अशी माहिती नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी दिली.
संपूर्ण पुणे शहरात व उपनगरात पाण्याची वानवा व पाण्यासाठी भटकंती करावी लागत असताना नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे व नगरसेविका प्राचीताई आल्हाट यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी पाण्याच्या टँकरची मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे याचा शुभारंभ आज दोन्ही नगरसेवकांच्या हस्ते व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. आशिष आल्हाट, अभिमन्यू भानगिरे, संतोष भानगिरे, रवींद्र भानगिरे, गणेश भानगिरे, सचिन तरवडे, शिवा शेवाळे, हिंदवी स्वराज्य ग्रुप, राम रहीम मित्र मंडळ, थोरली तालीम संघ सर्व पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख यावेळी उपस्थित होते.
प्रभागातील पाणीपुरवठा व विविध समस्यांसाठी पुणे महानगरपालिका, लष्कर पाणीपुरवठा व हडपसर क्षेत्रीय कार्यालयात विविध आंदोलने केली. मात्र महापालिकेच्या माध्यमातून पूर्व भागातील उपनगराकडे पाण्यासाठी दुर्लक्ष केले जात आहे आगामी काळात पाणी प्रश्न सोडवीला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा नगरसेवक प्रमोदनाना भानगिरे यांनी यावेळी दिला
महंमदवाडी प्रभागातील विविध ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुरळीत व्हावा यासाठी पाण्याच्या टाक्यांचे काम पालिकेच्या निधीतून सुरू आहे तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून आगामी काळात काळात पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे नगरसेविका प्राची अल्लाट यांनी यावेळी बोलताना सांगितले. पावसाळा सुरू होईपर्यंत मागणी प्रमाणे टँकर द्वारे पाणीपुरवठा मोफत केला जाणार आहे.

 

0 0 votes
Article Rating
219 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments