पुणे

स्पर्धेच्या जगात युवापिढीचे स्वास्थ्याकडे होतेय दुर्लक्ष; आर्यन मॅन दशरथ जाधव यांची खंत

हडपसर/पुणे (रोखठोक महाराष्ट्र प्रतिनिधी)
स्पर्धेच्या जगात युवा पिढीचे आपल्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होत आहे 62 व्या वर्षीही देशात अन विदेशात जाऊन एक हजार किलोमीटर सायकलिंग करताना स्वास्थ्याकडे मी गांभीर्याने पाहतो युवा पिढीने तंदुरुस्त व उत्साहवर्धक रहावे याकरिता दैनंदिन जीवनामध्ये फूड व व्यायामाकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे असे आवाहन उद्योजक व आर्यन मॅन दशरथ जाधव यांनी केले

इंडियन डेंटल असोसिएशन हडपसरच्या वतीने आयोजित बॅडमिंटन, कॅरम, चेस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ जाधव बोलत होते.
हडपसरचे शिखरे, हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, डॉ.तानाजी हंबीर, डॉ. सुहास लोंढे, डॉ.योगेश राऊत, यावेळी महाराष्ट्रातून आलेले डेंटल डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते

स्पर्धेचे संयोजन असोशियनचे अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी केले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, संगमनेर, औरंगाबाद, पुसद, या भागातून 90 स्पर्धक सहभागी झाले होते, अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पडली भविष्यात डॉक्टर व कुटुंबियांसाठी विविध स्पर्धा आणि शिबिरे आयोजित करणार असल्याचे इंडियन डेंटल असोशियनचे अध्यक्ष डॉ. जयदीप फरांदे यांनी सांगितले.
या स्पर्धेत स्पर्धेत डॉ. शुभम घोडके डॉ.अनिकेत बडवे, डॉ. मयूर पवार, डॉ. शुभम घोडके, डॉ. विवेक छेडे डॉ. ओमकार भालसिंग, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. उत्तरा राऊत, डॉ. गायत्री मोरे, डॉ. सुजाता पिंगळे, डॉ. जागृती दहीलकर, डॉ. अपूर्व शाहू, डॉ.महेश पवार, डॉ.जयदीप फरांदे, डॉ. अनिकेत कुगावकर, डॉ. आनंद भन्साळी, डॉ.प्रशांत कारंडे, डॉ. अविनाश बामणे यांनी पारितोषिके पटकावली यांनी पारितोषिके पटकावली.

 

0 0 votes
Article Rating
9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments