पुणे

कदमवस्ती येथे साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

लोणी काळभोर (कदमवाक् वस्ती )येथील पालखी स्थळ येथे विरंगुळा केंद्रात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या पोवाड्याने करण्यात आली हा पोवाडा शाहीर खुळपे यांनी सादर केला.

या कार्यक्रमाला कदम वाक वस्ती उपसरपंच नासिर पठाण, तसेच विजय ननवरे, सूर्यकांत गवळी, रामदास अण्णा पवार, फैयाज शेठ इनामदार, दत्ता अंबुरे, नितीन लोखंडे, विजय बोडके, राखपसरे निलेश खोले, शाहीर खुळपे, विजय सकट, मोठे मॅडम, श्रीकांत भिसे, पोलीस पाटील भिसे,  तुळशीराम घुसाळकर, लक्ष्मण चव्हाण, दयानंद भुसे, तानाजी ताकपेरे, संजय लोंढे, रमेश भोसले, राजू काळभोर, कुमार गायकवाड, कालिदास काळभोर, ओहाळ यांची उपस्थिती होती.