Uncategorizedपुणे

हडपसर मेडिकल असोसिएशनद्वारे ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ उत्साहात साजरा

देशभरात 23 सप्टेंबर हा दिवस ‘राष्ट्रीय आयुर्वेद दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हडपसर मेडिकल असोसिएशनने डॉ. अपूर्वा संगोराम, रिजनल कॉर्डिनेटर, फार्मकोव्हिजिलन्स विभाग, आयुष मंत्रालय यांचे
‘ आयुर्वेद औषधींचा परिणाम अभ्यास व त्यामध्ये डॉक्टरांचा सहभाग’ या विषयावर
व्याख्यान आयोजित करून साजरा केला गेला. हडपसर मेडिकल असोसिएशनचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. व्याख्यानाद्वारे रुग्णाने आयुर्वेदिक औषधी ही आयुर्वेद तज्ञांद्वारेच घ्यावीत व आयुष मंत्रालयाच्या या विभागाच्या कामामध्ये आयुर्वेद तज्ञांनी सहभाग वाढवावा, तो फार महत्त्वाचा आहे. असे त्यांनी आवाहन केले.

हडपसर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.मनोज कुंभार, सेक्रेटरी डॉ. राजेश खुडे खजिनदार डॉ. सतीश सोनवणे, डॉ. स्वप्नील लडकत, डॉ. प्रशांत चौधरी, डॉ.रसिक गांधी, डॉ.दादा कोद्रे, डॉ. सुहास लोंढे, डॉ. सारिका आरु, डॉ. वैभवी साबने, डॉ. विशाल साळुंखे, डॉ.रमेश शिरसागर, डॉ. नितीन शिंदे डॉ.अतुल होळे, आद्या हर्बलचे डॉ. भूषण केदारी हे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान सूत्रसंचालन डॉ.अमृता खामकर यांनी केले या दिनाच्या औचित्य साधून डॉ.प्रवीण गुंड यांचा ‘आनंद माझा’ हा पॉडकास्ट देखील अनावरित केला गेला. हा कार्यक्रम डॉ.सचिन आरू यांच्या श्री आरोग्यधाम आयुर्वेद व पंचकर्म हॉस्पिटल, थेऊर व हडपसर मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने यांनी आयोजित केला होता.