पुणे (हडपसर)
हडपसर सातववाडी येथील श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या मठामध्ये 🕉️ जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने श्री शंकर महाराज प्रगटदिनाचा सोहळा साजरा झाला. तो फक्त एक सोहळा नव्हता तर तो हृदयाला भिडणारा भक्तीचा महासागर होता. या पवित्र दिवशी श्री शंकर महाराज भक्तांच्या मनात श्रध्दा व भक्तीची लहर उसळलेली अनुभवास आली.
तीन दिवस चाललेल्या उत्सवात मठ विद्युत रोषणाईच्या ज्योतीने व फुलांच्या सुगंधाने उजळला होता. या काळात होमहवन दत्तयाग, सामुदायिक श्री शंकर गीता पारायण, अभिषेक, पंचपदी, जन्मोत्सव, पाळणा, प्रवचन इ. धार्मिक कार्यक्रमासोबतच नगर प्रदक्षिणा विद्युत रोषणाईने सजविलेल्या पालखीतून रांगोळीचे मार्गावरून विद्युत छत्री बॅडपथक, फटाक्याच्या आतषबाजीने करण्यात आली.
सुप्रसिद्ध गायिका सौ. हेमा कुलकर्णी तथा 🕉️ जय शंकर प्रतिष्ठानचे स्वर शोभा भजन मंडळाने भजन सेवा केली, वैदिक विधी श्री लक्ष्मीकांत समुद्र गुरुजी व श्री केदार गुरुजी तर पंचपदी हभप श्री ऋषिकेश चोरगे महाराज, सामुदायिक श्री शंकर गीता पारायण नेपथ्य सौ. स्मिता सोनटक्के यांनी केले. कर्मांचा सिद्धांत या विषयावर प्रवचन श्री अनिल कवडे आयएएस (नि) मा. आयुक्त महा. राज्य सह. निवडणूक प्राधिकरण यांनी केले ज्यामुळे भक्तांना आपल्या दैनंदिन कर्माचा तुलनात्मक अभ्यास करता आला. डाॅ. ईस्माईल शेख, (नवी दिल्ली) यांनी चारही वेदांचा अभ्यास उलगडून सांगितला.
यावेळी प.पू. महंत देवराह जंगल बाबा प्रयागराज, स्वामी आनंद सरस्वती तपोवन बद्रिनाथ, बी.टी.गुरव सर व भुलेश्वरनाथ तिवारी महाराज यांनी ध्यान धारणा, साधना, योग इ. विषयावर मार्गदर्शन केले.
यावेळी 🕉️ जय शंकर प्रतिष्ठानच्या वतीने एबीबीएम चे पुणे जिल्हाध्यक्ष श्री मंदार रेडे यांना जीवन गौरव पुरस्कार तर अजिंक्य नागरी सह.पत संस्थेच्या मा. संचालिका व सामाजिक कार्यकर्ती सौ. संगीता गायकवाड यांना प.पू. माई पुराणिक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास आमदार चेतन तुपे, माजी महापौर वैशालीताई बनकर, पल्लवीताई सुरसे, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे, राहूल आबा तुपे, नितीन गावडे, विनोद धुमाळ, गुरुवर्य गणेश शिंदे, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डाॅ.विनोद पोतदार, डाॅ.विकास निलंगेकर (लातूर), पुरोहित संघटनेचे अध्यक्ष तथा जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पुजारी संतोष वैद्य, पत्रकार सुधीर मेथेकर, वाय.जी पवार, व्यंकटेश्वरा हॅचरी प्रा. लि. चे सरव्यवस्थापक जयंत माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. अमित शेष, विद्यमान कुलसचिव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ, लोणारे व शरद सोनटक्के साहेब (राजगुरुनगर) यांनी केले, कार्यक्रमाचे चित्रीकरण सुप्रसिद्ध चित्रपट छायाचित्रकार मारुती पोतदार यांनी केले. कार्यक्रमाचे नेपथ्य सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक कानाजी व श्रीपाद पुराणिक यांनी केले. बंडोपंत अप्पा गोंधळे, मठाधिपती श्री स्वामी समर्थ मठ, गोंधळेनगर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी हिंदुजा जागृती समिती व सनातन संस्थेतर्फे महेश पाठक व सचिन घुले यांनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या शंखनाद कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून प.पू. श्री. सु.द.उपाख्य पप्पाजी पुराणिक यांना निमंत्रित करण्यात आले.
