पुणेहडपसर

आण्णासाहेब मगर महाविद्यालयात ‘आझाद हिंदची गाथा’ नाटकाचे सादरीकरण

देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करण्याच्या हेतूने भारताच्या स्वातंत्र्य प्रवासाची कहाणी आणि अमृत महोत्सवाची भावना साजरी करण्याच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय, आर्टिस्टिक हयूमन्स आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.

 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘आझाद हिंदची गाथा’ या नाटकात मयुरी खरचे (इंदिरा गांधी), सोनाली शेलार (दगडाबाई शेळके), ओम महामनी ( सुभाषचंद्र बोस), नितीन देडे (लोकमान्य टिळक), राहुल ओहोळ (बाबू गेनु), ऋतुजा जामदार (विद्यार्थिनी), वैष्णवी नाईक (इतिहास), सिद्धार्थ मानूरकर (भगत सिंह), अनिकेत जगताप (राजगुरू), तन्मय क्षीरसागर (सुखदेव), दर्शक सागडे (महात्मा गांधी), नम्रता अरसोड (राणी लक्ष्मीबाई), शफिक शेख – प्रकाश योजना, साहिल खरात – सहायक, प्रथमेश झगडे – सहायक, तुषार खंडागळे -पार्श्वसंगीत या कलावंत विद्यार्थ्यांनी अभिनय केला.

 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी, ७५ नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या ‘आझाद हिंदची गाथा’ या नाटकाची निवड झाल्याबद्दल ‘आझाद हिंदची गाथा’ या नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
भारत देशाला गौरवशाली अशा इतिहासाची परंपरा आहे. ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. त्याच प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते सावित्रीबाई फुले यांच्या पर्यंतचे महापुरुष आपल्याला देशाबद्दल प्रेरणा देतात. अशा भावना मध्यप्रदेश येथील अवधेष प्रताप सिंह विद्यापीठाच्या प्रा. डॉ. शुभा तिवारी यांनी व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या अभिनयाचे कौतुक केले.

 

कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. राजेश रसाळ यांनी केले.
या प्रसंगी या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, उपप्राचार्य डॉ. अनिल जगताप, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, प्रा. विजयाश्री डुंबरे, प्रा. सुषमा पाटील, प्रा. दीपाली गायकवाड, प्रा. सुवर्णा बराटे, प्रा. ज्योती धुमाळ, प्रा. जयश्री अकोलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सविता कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. शुभांगी औटी यांनी मानले.