पुणेहडपसर

बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता वाढवा : दशरथ जाधव

अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या हडपसर ते रायरेश्वर या सायकल रॅलीचा शुभारंभ

बौद्धिक क्षमतेबरोबर शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी नीत्य व्यायामाची आवश्यकता आहे. सायकलिंग करताना नियमितता व शिस्त महत्वाची असते. खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते ही भावना निकोप समाजासाठी आवश्यक असते. असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रामॅन (फ्लोरिडा अमेरिका) दशरथ जाधव यांनी केले.

 

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हडपसर ते रायरेश्वर या सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीमध्ये अण्णासाहेब मगर महाविद्यालय व परिसरातील इतर महाविद्यालयातील ५० विद्यार्थी व १० शिक्षक सहभागी झाले आहेत. या सायकल रॅलीचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय खेळाडू अल्ट्रामॅन (फ्लोरिडा अमेरिका) दशरथ जाधव यांच्या हस्ते व आयर्न मॅन डॉ. शंतनू जगदाळे यांच्या उपस्थितीत झाला. या प्रसंगी देविदास होले, रणधीर टकले, वैभव पिलाणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे उपस्थित होते.

 

सध्या आरोग्य, वाहतूक, पर्यावरण या संबंधी विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी. विद्यार्थ्यांना सायकल वापरण्याची सवय लागावी. हा हेतू असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे यांनी सांगितले.
या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, अनिल जगताप, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. प्रितम ओव्हाळ, डॉ. नाना झगडे, प्रा. नितीन लगड, डॉ. धीरज देशमुख, डॉ. राजेश रसाळ, प्रा. आकाश निंबाळकर, डॉ. नीता कांबळे, प्रा. सुप्रिया भोसले उपस्थित होते.

 

रॅलीच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समनव्यक डॉ. सविता कुलकर्णी, प्रा. प्रितम ओव्हाळ, अमोल गायकवाड, श्रीकृष्ण थेटे, धीरज सोनवणे, राजेंद्र औटे, विशाल कोलते, स्वप्नील सोनवने, अमन शेख, भारती घाडगे, प्रा. प्रतीक कामठे, प्रा. गौरव शेलार, . चंद्रकांत साठे, श्री. अमोल कचरे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नितीन लगड, यांनी केले.