प्रतिनिधी – स्वप्नील कदम
लोणी काळभोर पोलिसांनी अवैध्य गावठी दारूची वाहतूक करणाऱ्या विरुद्ध कारवाई करून सुमारे १० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एका संशयिताला अटल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार थेऊर- कोलवडी रस्त्यावर थेऊरगाव हद्दीतील स्मशानभूमि जवळ गावठी दारूची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याची माहिती गुप्त बातमीदारा मार्फत थेऊर पोलीस चौकीचे उपनिरीक्षक रत्नदिप बिराजदार व दिगंबर सोनटक्के यांना मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मुळामुठा नदी जवळ सापळा रचला असता काही वेळातच बातमी दाराकडून वर्णन केलेली पिकप आढळून आली.
पोलिसांनी पिकप गाडीची तपासणी केली असता गाडीत भुशाच्या पोत्याखाली लपून ठेवलेले ६० प्लास्टिक कॅन (प्रत्येकी ३५ लिटर) असे एकूण २००० लिटर हातभट्टी दारू आढळून आली.
याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ सुरेश राखपसरे (वय २९ ,रा. दहिटणे ता. दौंड )याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे , सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले ,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे,गुन्हे निरीक्षक स्मिता पाटील, उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार, दिगंबर सोनटक्के, हवालदार दिगंबर जगताप, अमोल जाधव, मल्हारी ढमढेरे, दत्तात्रय गोगाणे, आणि दत्तात्रय तेलंगे यांच्या पथकाने केली आहे.
या कारवाईमुळे परिसरातील अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्यां टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
