मुंबई-कमलेश सुतार हे नाव आता महाराष्ट्रातील निर्भीड पत्रकारितेचे प्रतीक बनले आहे. त्यांची बातमी एकाच वेळी सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी असते आणि सर्वसामान्यांची लढाई लढणारी असते. त्यांनी आतापर्यंत अनेक स्फोटक प्रकरणांचा पर्दाफाश करून सर्वसामान्यांची न्यायाची बाजू लावून धरली आहे.
राजकीय सत्तेतील भ्रष्टाचार असो, पोलिस यंत्रणेतील गैरव्यवहार असो किंवा सत्तेतेली व्यक्तींचे गैरप्रकार असोत… प्रत्येक वेळेला कमलेश सुतार यांनी निर्भयतेने पत्रकारिता करत सत्य जनतेसमोर आणले आहे.
या निर्भीड वृत्तांकनासाठी त्यांना अनेकदा धमक्या, दबाव, आणि विरोधाचा सामना करावा लागला. पण ‘भीती’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. उलट प्रत्येक हल्ल्यानंतर ते अधिक धारदारपणे प्रकट झाले. त्यांचे ‘सत्य सांगण्याचे’ ब्रीदवाक्य आजच्या महत्त्वाच्या मुद्यांवर बोटचेपी भूमिका घेणाऱ्या माध्यम जगतात एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे!
‘पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरण’ एक्स्पोज करून त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की, महाराष्ट्रात अजूनही असे पत्रकार आहेत जे सत्यासाठी लढतात, सत्ता कोणाची आहे याची पर्वा करत नाहीत! कमलेश सुतार यांचा हा धाडसी एक्स्पोज म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे!
पत्रकारितेचा खरा हेतू म्हणजे सत्तेला प्रश्न विचारणे… आणि तो जर कोणीतरी निर्भयतेने करत असेल, तर त्याचं नाव आहे… कमलेश सुतार!
हेही वाचा, कमलेश सुतार कोण ?
दूरदर्शन च्या सातच्या बातम्या पासून सुरू झालेला प्रवास ते इंग्रजी भाषेतील राष्ट्रीय चॅनेल वर पत्रकारिता , एक बेस्ट सेलर पुस्तक आणि पत्रकार म्हणून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेलेली दखल असा थक्क करणारा प्रवास म्हणजे कमलेश लीलावती दामोदर सुतार!
सामान्य कुटुंबातला जन्म, नाशिकमध्ये शालेय शिक्षण घेत कमलेश यांनी लहानपणापासूनच वाचनाची आवड जपली, जोपासली !
दूरदर्शन वर इंग्रजी भाषिक अँकर, टाईम्स नाऊ , आणि इंडिया टुडे आणि आजतक या वाहिन्यांवर 13 वर्षं कमलेश सुतार हे नाव देशपातळीवर नेहमी चर्चेत असलेलं नाव !
लोकशाही मराठी या चॅनल च्या मुख्य संपादक पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी टीव्ही पत्रकारितेला नव्या उंचीवर नेऊन ठेवले.
महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या, दुष्काळी परिस्थिती, दलित-शोषितांच्या समस्या यावर गेली 25 वर्षे त्यांनी केलेले काम नेहमीच प्रशंसनीय ठरले.
महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये रिपोरटिंग करत त्यांनी आपल्या कामाची राष्ट्रीय स्तरावर छाप पाडली. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर जबरदस्त प्रभुत्व असणाऱ्या कमलेश सुतार यांनी या तिन्ही भाषांमध्ये आपल्या पत्रकारितेने हुकूमत गाजवली.
निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकार अशी कमलेश यांची ओळख आहे. मध्य प्रदेशातील कुख्यात ‘व्यापम’ घोटाळ असो गुजरात मधला बाल कामगार शोषणाचा पर्दाफाश , गोव्यातील खाण घोटाळा , रशियन माफियांचं गोव्यातील वर्चस्व या सारख्या देशाला हादरावणाऱ्या बातम्या त्यांनी केल्या आणि शोधपत्रकारितेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं !
महाराष्ट्रातल्या प्रतिष्ठेच्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या यमुनाबाई खाडिलकर शोध पत्रकारिता पुरस्कार तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या पा.वा. गाडगीळ पुरस्कार, संपादक परिषदेचा प्रबोधनकार ठाकरे पत्रकारिता पुरस्कार, मुक्तपीठ सर्वोत्कृष्ट संपादक पुरस्कार अश्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे. दलित चळवळीतील लोकसंगीताचे योगदान या विषयी त्यांच्या कामाला मुंबई प्रेस क्लबच्या आंतरराष्ट्रीय रेड इंक पुरस्काराने गौरविण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाचा राजकीय पत्रकारितेसाठी देण्यात येणारा रमेश भोगटे पुरस्कार देखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
कमलेश यांच्या पत्रकारितेतल्या योगदानाची दखल थेट ब्रिटिश सरकारने घेतली ! ब्रिटिश सरकार तर्फे देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या चिवनिंग फेलोशिप साठी त्यांची निवड करण्यात आली. संपूर्ण आशिया खंडातून फक्त 15 पत्रकारांची यासाठी निवड करण्यात आली. कुठल्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल अशी ही कामगिरी !
२०१९ च्या राजकीय सत्ता नाट्यावर आधारित कमलेश यांचे 36 Days हे पुस्तक प्रचंड गाजले. सर्वाधिक खपाचे असे बेस्टसेलर पुस्तक ठरले.
सध्या ते झी 24 तास या अग्रगण्य मराठी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे रोखठोक, टू द पॉईंट हे कार्यक्रम त्यांच्या सखोल विश्लेषणासाठी ओळखले जातात.
सामान्य शेतकरी कुटुंबातील कमलेश सुतार ते आज देश पातळीवर ज्यांचं नाव आदराने मोठ्या पत्रकारांच्या यादीत घेतलं जातं असे कमलेश सुतार, हा प्रवास अविश्वासनीय असाच आहे !
