प्रतिनिधी – स्वप्नील कदम
लोणी काळभोर, : कदमवाक् वस्ती येथिल हायवे लगत असलेल्या कवडी पाठ येथे एक निंदनीय प्रकार घडला आहे चक्क कदम वाक् वस्ती येथिल माजी ग्रामपंचायत सदस्याने खाजगी जमिनीवर अतिक्रमण करून पत्रा शेड व बोर्ड मारुन जागामालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट परिसरात शनिवार (ता.८) ते रविवारी (ता. ९) या दरम्यान घडली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रितम गायकवाड यांच्यासह 7 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रितम त्रिंबक गायकवाड, निल प्रितम गायकवाड (दोन्ही रा. कदमवाकवस्ती ता. हवेली जि.पुणे) व त्यांचेसोबत असलेले ४ ते ५ अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनिल रामचंद्र थोरात (वय-४३ , धंदा-शेती, रा. येळपणे ता. श्रीगोंदा जि.अहिल्यानगर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीपाट परिसरात गट नंबर ९४२ व ९४३ मध्ये फिर्यादी सुनिल थोरात यांची मालती रामचंद्र थोरात यांच्या नावे ४४ आर ऐवढी जमिन होती. घरामध्ये आर्थिक अडचण निर्माण झाल्याने सदर जमिन मालती थोरात यांनी सन २०११ मध्ये विक्रीस काढली. त्यावेळेस फुरसुंगी येथील संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिन विक्री करण्यात आली.
जागामालक संतोष ठकसेन पवार, प्रजित दिनकर हरपळे व चंद्रकांत रामदास हरपळे यांनी सदर जमिनिमध्ये घरबांधणी करीता प्लाटींग करून विक्री करण्यास सुरवात केली. त्यानंतर फिर्यादी सुनिल थोरात, त्यांचे भाऊ अनिल थोरात, संतोष थोरात व बहीण भारती चंद्रकांत भालेराव यांनी गट नंबर ९४२ मध्ये ५.६ आर ऐवढी जमिन विकत घेतली. सदर जमिनीचे खरेदीखत झाल्यानंतर जमिनीच्या मालकांनी पवार सह तेथे जागा विकत घेतलेल्या लोकांना ताबा दिला आहे. काही लोकांनी तेथे राहण्याकरीता घरे देखील बांधले आहेत.
दरम्यान, प्रितम गायकवाड, निल गायकवाड यांनी सुनिल थोरात यांच्या जमिनीमध्ये बेकायदा जमाव जमविला. व
पत्रा शेड व बोर्ड मारुन अतिक्रमण केले. तसेच फिर्यादी यांना हाताने मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली. अशी फिर्याद सुनिल थोरात यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.
