मराठी मनोरंजन विश्वात आज एक नवा अध्याय सुरू झाला आहे.
चित्रपट, ओटीटी आणि टीव्हीपलीकडे आता युट्यूब मालिकेच्या माध्यमातून कलाकारांसाठी एक नवं व्यासपीठ खुलं झालं आहे.
‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या पहिल्या मराठी युट्यूब वेबमालिकेचा भव्य लॉन्च सोहळा पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात उत्साहात पार पडला.
यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले की,
मराठी मनोरंजन क्षेत्रात गुणवंत कलाकारांची कमतरता नाही, मात्र माध्यमांच्या मर्यादांमुळे सर्वांनाच संधी मिळत नाही.
युट्यूब मालिकेमुळे कलाकारांना नवं व्यासपीठ मिळेल आणि निर्मात्यांचं आर्थिक गणितही जुळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या सोहळ्याला प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, अभिनेते शिवभक्त सचिन गवळी,
मालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड, राम अश्रुजी पाटील
आणि दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.
यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मितीमागील प्रवास आणि संकल्पना मांडली.
‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’
ही मालिका येत्या 9 फेब्रुवारीपासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता युट्यूबवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.
