पुणे शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ज्या विभागावर आहे,
त्याच पुणे महापालिकाच्या आरोग्य विभागात आज खुलेआम भ्रष्टाचार सुरू आहे — ही धक्कादायक माहिती समोर आली आहे!
हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या अंतर्गत प्रभाग १५, १६, १७ तसेच फुरसुंगी आणि उरुळी देवाची भागातील आरोग्य कोठ्यांमध्ये मुकादमांकडून कामगारांच्या पगारावर “वाई कट” नावाने बेकायदेशीर वसुली केली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. जे कामगार पैसे देत नाहीत, त्यांना नाहक त्रास दिला जातो, बदलीची धमकी दिली जाते, तर जे पैसे देतात — त्यांच्यावर कुणीही कारवाई करत नाही! धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकारात एसआय, डीएसआय आणि काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच, वरपर्यंत ‘मलई खाण्याचा’ प्रकार सुरू असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे! कामगारांनी तक्रार केली तरी,
“हात ओले” झाल्यामुळे फाईलींवर पांघरून घातले जाते, आणि मुकादम दिवसेंदिवस अधिकच निगरगठ्ठ बनत चालले आहेत. या संपूर्ण भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश
रोखठोक महाराष्ट्र न्यूज लवकरच मालिकेच्या माध्यमातून करणार आहे!
आता प्रश्न असा आहे की — आयुक्त
आणि नूतन महापौर या प्रकरणात लक्ष घालून कठोर कारवाई करणार का? जर हडपसर, फुरसुंगी, उरुळी देवाची भागातील कोणत्याही कामगारांना मुकादम किंवा अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असेल,
तर त्यांनी रोखठोक महाराष्ट्र न्यूज चॅनलशी संपर्क साधावा —
तुमचा आवाज आम्ही दाबून टाकू देणार नाही!
भ्रष्टाचाराला आळा बसवण्यासाठी
आम्ही शेवटपर्यंत लढणार आहोत!
हा आवाज थांबणार नाही… हा लढा सुरूच राहणार! 🚩 अधिक माहितीसाठी संपर्क 9822062824 यावर कॉल करा
