पुणे

हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग | १९ झोपड्या खाक | कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान……!

क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री भीषण आग.
Hadapsar येथील लोहिया उद्यानाजवळ, Ranka Jewellers च्या पाठीमागील मजूर व कामगार वस्तीत
पत्र्याच्या व बांबूच्या शेड असलेल्या १९ झोपड्या आगीत पूर्णपणे खाक झाल्या. नागरिक गाढ झोपेत असताना आग लागल्याने
घरातील सर्व सामान, संसारोपयोगी वस्तू जळून राख झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी नाही, ही दिलासादायक बाब आहे.
माहिती मिळताच Pune Fire Brigade घटनास्थळी दाखल झाली. आग वेगाने पसरल्यामुळे अनेकांना सामान बाहेर काढायलाही वेळ मिळाला नाही.

आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही;
प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किट किंवा गॅस गळतीची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, बाधित कुटुंबांना तात्पुरत्या सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं असून
स्थानिक प्रशासनाकडून प्राथमिक मदतीची व्यवस्था करण्यात येत आहे.
पोलिसांकडूनही स्वतंत्र चौकशी सुरू असून नुकसानाचा अंतिम अहवाल लवकरच तयार होणार आहे.
पीडित कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन.