गॅस सिलेंडर बुक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा!
सध्या LPG डिलिव्हरीच्या नावाखाली मोठा ऑनलाइन स्कॅम सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक लोकांच्या मोबाईलवर “Pay Now, Get Gas Tomorrow” असा मेसेज व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसद्वारे पाठवला जात आहे.
या मेसेजमध्ये एक लिंक दिलेली असते. लोकांना सांगितले जाते की, आता पैसे भरले तर उद्या गॅस सिलेंडर डिलिव्हरी मिळेल.
मात्र तज्ज्ञांच्या मते हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. जर तुम्ही या लिंकवर क्लिक केले किंवा माहिती भरली तर तुमचे बँक अकाऊंट रिकामे होऊ शकते.
सध्या देशात गॅस सिलेंडरची टंचाई असल्यामुळे अनेक लोक लवकर सिलेंडर मिळावा म्हणून अशा मेसेजवर विश्वास ठेवत आहेत, आणि त्याचाच फायदा स्कॅमर्स घेत आहेत.
दरम्यान Indane, Bharat Gas आणि HP Gas या गॅस कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की,
अधिकृत LPG कंपन्या कधीही व्हॉट्सअॅप किंवा एसएमएसवर लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगत नाहीत.
म्हणून जर तुम्हाला असा कोणताही मेसेज आला तर त्या लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतीही माहिती देऊ नका.
सावध रहा… कारण एक चुकीचा क्लिक तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.
