पुणे

मोबाईल हॅक करून शिक्षिकेला ब्लॅकमेल! व्हिडिओ कॉलवर नग्न व्हायला लावलं; बुलढाण्यात धक्कादायक प्रकार

महाराष्ट्र हादरवणारी धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यात समोर आली आहे.
एका 27 वर्षीय तरुणाने महिला शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून तिच्या खासगी आयुष्यात घुसखोरी केली. मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि वैयक्तिक माहिती चोरून त्याने बनावट अश्लील फोटो तयार केले.
यानंतर आरोपीने शिक्षिकेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. “तुझे फोटो आणि व्हिडिओ मी तुझ्या पती आणि नातेवाईकांना पाठवेन”, अशी धमकी देत त्याने वारंवार व्हिडिओ कॉल केले.
धमकीच्या भीतीने घाबरलेल्या शिक्षिकेला त्याने व्हिडिओ कॉलवर विवस्त्र व्हायला भाग पाडले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी केली.

“जर तू माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारेन”, अशी थेट धमकीही दिली.
अखेर मानसिक छळ सहन न झाल्याने शिक्षिकेने बुलढाण्यातील सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी ऋषिकेश गिरी विरोधात गुन्हा दाखल केला असून तो सध्या फरार आहे.
मोबाईल हॅकिंग आणि सायबर ब्लॅकमेलिंगच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे —
आपला मोबाईल खरंच सुरक्षित आहे का?