पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातून व्यापाऱ्याच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे!
Market Yard Pune येथून २४ मार्च रोजी एका व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी दीड कोटी रुपयांची खंडणी मागत पत्नीला व्हॉट्सअॅप कॉल करून धमकी दिली — “माझ्या जिवाला धोका आहे, पैसे तयार ठेवा!”
पत्नीने तात्काळ Swargate Police Station येथे तक्रार दाखल केली… आणि इथून सुरू झाला थरारक पोलिस ऑपरेशन!
पोलिसांनी दोन विशेष पथके तयार करून सापळा रचला. आरोपी सतत लोकेशन बदलत होते — नटराज हॉटेलजवळून मित्र मंडळ चौकापर्यंत!
शेवटी पोलिसांनी शिताफीने दोन आरोपींना पकडलं —
👉 प्रणव बबन निवंगुणे (23)
👉 साहिल श्रीकांत खुटवड (21)
चौकशीतून उघड झाला संपूर्ण कट!
यानंतर खेड शिवापूर येथे छापा टाकून अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
या प्रकरणात आणखी तीन आरोपी अटकेत —
👉 सौरव विश्वनाथ पवार (27)
👉 शिरीष जितेंद्र खोपडे (26)
👉 मंदार श्रीधर दारवटकर (30)
धक्कादायक म्हणजे — यातील चार आरोपी सराईत गुन्हेगार आहेत!
👉 पुणे पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे मोठी घटना टळली… पण प्रश्न आहे — शहरात गुन्हेगार इतके बेधडक कसे?
